वायदा केला विसरू नका
वायदा केला, विसरू नका याद ठेवा पक्की
जमलं तर आज या, न्हाइ तर उद्या नक्की
यावं जरा जपून जपून
परसदारी बसा लपून
पहिलवान दादा माझा, ठेवून देईल बुक्की
गुपित ठेवा मनचं मनी
हळूच बोला, ऐकल कोणी
चहाडखोर मुलखाची वहिनी माझी सख्खी
अंगरखा जरतारी
फेटा बांधा कोल्हापुरी
थाट बघुन इंद्राची ऐट पडल फिक्की
जमलं तर आज या, न्हाइ तर उद्या नक्की
यावं जरा जपून जपून
परसदारी बसा लपून
पहिलवान दादा माझा, ठेवून देईल बुक्की
गुपित ठेवा मनचं मनी
हळूच बोला, ऐकल कोणी
चहाडखोर मुलखाची वहिनी माझी सख्खी
अंगरखा जरतारी
फेटा बांधा कोल्हापुरी
थाट बघुन इंद्राची ऐट पडल फिक्की
गीत | - | पु. ल. देशपांडे |
संगीत | - | पु. ल. देशपांडे |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | दूधभात |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.