वसंतीं बघुनि मेनकेला
वसंतीं बघुनि मेनकेला । गाधिजमुनिनें निजसुतपावरि उदकांजलि दिधला ।
पराशर मोहुनियां गेला । नौकेमाजीं धीवर-कन्यासंगोत्सुक झाला ।
वसिष्ठही ब्रह्मनिष्ठ कसला । परि स्नुषेवरि लोभ धराया मनिं नच तो विटला ॥
पराशर मोहुनियां गेला । नौकेमाजीं धीवर-कन्यासंगोत्सुक झाला ।
वसिष्ठही ब्रह्मनिष्ठ कसला । परि स्नुषेवरि लोभ धराया मनिं नच तो विटला ॥
गीत | - | अण्णासाहेब किर्लोस्कर |
संगीत | - | अण्णासाहेब किर्लोस्कर |
स्वर | - | |
नाटक | - | सौभद्र |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
टीप - • या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल. |
धीवर | - | मासे पकडणारा कोळी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.