वासाचा पयला पाऊस
वासाचा पयला पाऊस अयला
नभाचे घुम्मड मातीये भारियला
पान्याचे तरिंगेवरी थरारियला
जळीचे तळीले हुंकीर पेटियला
फुलांनी हळूच डोळा उचिलेला
कळीने लाजून मुर्का मारियला
तुला बि कळीले, मला बि कळीले
हातामदी हात अपाप मळिले
नभाचे घुम्मड मातीये भारियला
पान्याचे तरिंगेवरी थरारियला
जळीचे तळीले हुंकीर पेटियला
फुलांनी हळूच डोळा उचिलेला
कळीने लाजून मुर्का मारियला
तुला बि कळीले, मला बि कळीले
हातामदी हात अपाप मळिले
गीत | - | अशोक बागवे |
संगीत | - | कौशल इनामदार |
स्वराविष्कार | - | ∙ उदेश उमप ∙ मनिषा जोशी, मिलिंद जोशी ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
अल्बम | - | गर्द निळा गगनझुला |
गीत प्रकार | - | ऋतू बरवा, भावगीत |
टीप - • स्वर- उदेश उमप, संगीत- कौशल इनामदार. • स्वर- मिलिंद जोशी, मनीषा जोशी संगीत- मिलिंद जोशी. |
अपाप | - | आपोआप. |
उचियेला | - | उचलला. |
घुम्मड | - | घुमटाकार वास्तूत निर्माण होणारा, घुमणारा ध्वनी. |
हुंकीर | - | हुंकार. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.