वळणावरुनी वळली गाडी
वळणावरुनी वळली गाडी आज सोडलं गांव
तुझ्याच आई, अश्रूसंगे पुसले पहिले नांव
नवनावाचं लेवुनी कुंकू जाते माझ्या घरा
वेडी माया झरते नयनीं भिजवित सारी धरा
"संभाळुन जा, सुखी रहा तूं, जातीस भरल्या घरा"
बोलांतुन या भिजल्या आला धीर तुझ्या पांखरा
पाखर आई तव मायेची उदंड लाभो मला
जायाच्या ग अशाच लेकी तोडुनि ममता-लळा
तूंच पाहुनी 'ठेव' सुखाची दिलीस माझ्या करीं
तेज मुखावर बघशिल येतां, भेटायाला घरी
तुझ्याच आई, अश्रूसंगे पुसले पहिले नांव
नवनावाचं लेवुनी कुंकू जाते माझ्या घरा
वेडी माया झरते नयनीं भिजवित सारी धरा
"संभाळुन जा, सुखी रहा तूं, जातीस भरल्या घरा"
बोलांतुन या भिजल्या आला धीर तुझ्या पांखरा
पाखर आई तव मायेची उदंड लाभो मला
जायाच्या ग अशाच लेकी तोडुनि ममता-लळा
तूंच पाहुनी 'ठेव' सुखाची दिलीस माझ्या करीं
तेज मुखावर बघशिल येतां, भेटायाला घरी
गीत | - | वसंत सबनीस |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | मालती पांडे |
गीत प्रकार | - | भावगीत |
उदंड | - | पुष्कळ. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.