ऊठ जानकी मंगल घटिका
ऊठ जानकी, मंगल घटिका आली आनंदाची
सरली आता चौदा वर्षे अपुल्या वनवासाची
सरले आता इथे राहणे रानी, वनी अंधारी
तातांच्या वचनांची पूर्ती झाली आज अखेरी
ऊठ जानकी, मंगल घटिका आली आनंदाची
पर्णकूटिका सोडायाची वेळ आजला आली
पुन्हा जायचे आपण अपुल्या महाली वैभवशाली
वल्कल सोडून राजवस्त्र ही फिरुनी तुज ल्यायाची
राजधानीला जायाचे चल फिरुनी आता त्वरे
दुरुनी दिसतिल चमचमणारी शिखरे अन् मंदिरे
क्षणांत होशिल फिरुनी आतां राणी तू राजाची
सरली आता चौदा वर्षे अपुल्या वनवासाची
सरले आता इथे राहणे रानी, वनी अंधारी
तातांच्या वचनांची पूर्ती झाली आज अखेरी
ऊठ जानकी, मंगल घटिका आली आनंदाची
पर्णकूटिका सोडायाची वेळ आजला आली
पुन्हा जायचे आपण अपुल्या महाली वैभवशाली
वल्कल सोडून राजवस्त्र ही फिरुनी तुज ल्यायाची
राजधानीला जायाचे चल फिरुनी आता त्वरे
दुरुनी दिसतिल चमचमणारी शिखरे अन् मंदिरे
क्षणांत होशिल फिरुनी आतां राणी तू राजाची
गीत | - | श्रीनिवास खारकर |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | मालती पांडे |
गीत प्रकार | - | भावगीत, राम निरंजन |
कुटिर (कुटी) | - | झोपडी. |
वल्कल | - | वृक्षाच्या सालीचे केलेले वस्त्र. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.