उर्मिले त्रिवार वंदन तुला
उर्मिले, त्रिवार वंदन तुला !
त्यजुनि राजसुख जरी जानकी
वनात गेली प्रभु-सांगाती
राजमंदिरी तूच साहिल्या वियोगातल्या कळा !
सतत साउलीसम रामाला
भ्राता लक्ष्मण कृतार्थ झाला
तुझ्या मनातिल मुक्या भावना, कधी न तो उमगला !
अंधारातिल तू ज्योतीसम
आयु वेचिले अपुले कण कण
सुख-तृप्तीचा कधी न तुला गे वाराही लाभला !
राम-जानकी वियोगातुनी
घडले रामायण हे भुवनी
तुझी तपस्या, तुझा त्याग परि नच लोकी ठसला !
थोरचरित तू, दूर राहुनी
सुगंध भरला तू रामायणी
उपेक्षाच परि तुझ्या कपाळी न्याय जगी आगळा !

गीत | - | राजा मंगळवेढेकर |
संगीत | - | प्रभाकर जोग |
स्वर | - | राम फाटक |
राग | - | भैरवी |
गीत प्रकार | - | भावगीत |
आगळा | - | अग्रेसर / श्रेष्ठ / जास्त / अधिक / वैशिष्ट्यपूर्ण. |
भ्राता | - | भाऊ. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.