A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
उंच उंच माझा झोका

उंच उंच माझा झोका, झोका बांधला आकाशाला
झोका चढता उतरता झाला पदर वारा वारा

झोक्याला देते वेग पाय टेकून धरणीला
लाल मातीच्या परागाचा रंग चढतो पावलाला

झोका चढतो पूर्वेवर, जाईजुईंनी सावरीला
दंवा-धुक्याचा शुभ्र साज अंगावरती चढविला

झोका चढतो पश्चिमेला, वेल लालन देते तोल
मोकळ्या केसांमधे गुंफी सनया लाल लाल

झोका चढतो उंच उंच, पाय पोचती मेघांवरती
इंद्राच्या डोहावरी लाल पाखरे पाण्या येती

झोका चढतो उंच उंच, मला थांबता थांबवेना
गुंजेएवढे माझे घर त्याची ओळख आवडेना

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  पद्मजा फेणाणी-जोगळेकर