उल्हासाचे रंग भरले
उल्हासाचे रंग भरले नभांतरी दशदिशांतरी
नवकिरणांचे दूत निघाले पूर्व दिशेहुन नाचत नाचत
नवीन गाणी ओठावरती किलबिलते पक्ष्यांची पंगत
सोनेरी स्वप्नांची झालर पहाटवार्यावरती विहरत
नवी चेतना भरून घ्यावी ज्याने त्याने हृदयागारी
दुथडी भरुनी प्रकाशगंगा गिरिराजीतुन येते आहे
उज्ज्वलतेचा कलश उरावर मिरवित मिरवित येते आहे
हळू हळू तिमिराची वाळू अपुल्या उदरी गिळते आहे
न्हातिल पाने हिरवी राने, न्हाउन घेतिल कडेकपारी
मतभेदांच्या पाडुन भिंती प्रेमाचे घर उभे करूया
स्नेहसुमांच्या गुंफुन माळा हृदयाची दारे सजवूया
मनामनांच्या तारा जुळतिल, विश्वासाची गाणी फुलतिल
सहयोगाची ध्वजा फडकता प्रगतीची वाजेल तुतारी

गीत | - | यशवंत देव |
संगीत | - | कनू घोष |
स्वर | - | आकाशवाणी गायकवृंद |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
आगर | - | शेत, मळा. |
कपार | - | खबदड. |
गिरी | - | पर्वत, डोंगर. |
थडी | - | तीर / कुळ / मर्यादा. |
सुम | - | फूल. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.