उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी
उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी
जय श्रमदेवी, जय श्रमदेवी, जय श्रमदेवी कृपा करी
दुर्दैवाचे पहाड फोडू
अमोल दौलत खणुनी काढू
मातीमधुनी सोने लपले, धरणीच्या उदरी
उभ्या पिकाची हिरवी पाती
कणसामधले जपती मोती
खळ्यात पडल्या डोंगरराशी, लुटुया दौलत खरी
दैव आमुचे आम्ही घडविले
भाग्यदान हे पदरी पडले
जगावेगळे वास्तुशिल्प हे, कृष्णाची नगरी
जय श्रमदेवी, जय श्रमदेवी, जय श्रमदेवी कृपा करी
दुर्दैवाचे पहाड फोडू
अमोल दौलत खणुनी काढू
मातीमधुनी सोने लपले, धरणीच्या उदरी
उभ्या पिकाची हिरवी पाती
कणसामधले जपती मोती
खळ्यात पडल्या डोंगरराशी, लुटुया दौलत खरी
दैव आमुचे आम्ही घडविले
भाग्यदान हे पदरी पडले
जगावेगळे वास्तुशिल्प हे, कृष्णाची नगरी
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | प्रभाकर जोग |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | थांब लक्ष्मी कुंकू लाविते |
गीत प्रकार | - | चित्रगीत, स्फूर्ती गीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.