उदासीन का वाटती
उदासीन का वाटती आज तारा?
उदासीन का वाहतो आज वारा?
जगुनी जगी काय जीवा मिळाले?
तुझे पांखरा पंख सारे गळाले
तुझ्या कोटरी का तुझा कोंडमारा?
नुरे आस का उंच झेपावण्याची?
तुला वाटते लाज ऐशा जिण्याची !
कशासाठी हा चालला खेळ सारा?
पडावे असे झाकुनी गच्च डोळे
स्वत:पासुनी दूर व्हावे निराळे
मुक्या अश्रुंनी का पुसावा पसारा
उदासीन का वाहतो आज वारा?
जगुनी जगी काय जीवा मिळाले?
तुझे पांखरा पंख सारे गळाले
तुझ्या कोटरी का तुझा कोंडमारा?
नुरे आस का उंच झेपावण्याची?
तुला वाटते लाज ऐशा जिण्याची !
कशासाठी हा चालला खेळ सारा?
पडावे असे झाकुनी गच्च डोळे
स्वत:पासुनी दूर व्हावे निराळे
मुक्या अश्रुंनी का पुसावा पसारा
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | सुधीर फडके |
चित्रपट | - | झेप |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
कोटर | - | झाडातली ढोली. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.