A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
त्यांनीच छेडिले ग

त्यांनीच छेडिले ग माझ्या मनी न होते
ओढून ओढणीला दारी उभी मी होते

करपाश तोचि आले कंठी गडे तयांचे
भारावल्या मनाने मी ग अबोल होते

अपराध काही नसता शिक्षा मला मिळाली
माझ्याच मंदिरी ग मी बंदिवान होते

दिनरात साजणाचे बेबंद वागणे हे
असते सुखात जर का, मी बालिकाच होते
पाश - जाळे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.