A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
त्या तुझिया चिंतनात

त्या तुझिया चिंतनात मन माझे गुंतू दे
गीताच्या एकसरी भावफुले गुंफू दे

श्रवणी ये नाम जसे
मूर्ती पुढती विलसे
रूप मनी आठवुनी नित्य तुला पाहू दे

भाव एक नव-नवा
गंध धुंद करी जीवा
जीवशिव संगतीत मनकलिका उमलू दे

छंद तुझा क्षणोक्षणी
बरवा मज दिन-रजनी
गीत तुझे आळवुनी तुजसाठी गाऊ दे