त्या मैफलीत तेथे
त्या मैफलीत तेथे तेजाळ ज्योत होती
झाला पतंग माझा, ती ज्योत तूच होती
आतुर भावनांच्या धुंदीत धुंद होता-
अनिवार लागलेली ती ओढ तूच होती
उत्तान यौवनाचे बेभान रूप बघता-
हृदयास जाळणारी ती आग तूच होती
मदहोष त्या रतीच्या नयनांत पाहता मी,
नयनांतल्या महाली सजणी ग तूच होती
झाला पतंग माझा, ती ज्योत तूच होती
आतुर भावनांच्या धुंदीत धुंद होता-
अनिवार लागलेली ती ओढ तूच होती
उत्तान यौवनाचे बेभान रूप बघता-
हृदयास जाळणारी ती आग तूच होती
मदहोष त्या रतीच्या नयनांत पाहता मी,
नयनांतल्या महाली सजणी ग तूच होती
गीत | - | उमाकांत काणेकर |
संगीत | - | बाळ पार्टे |
स्वर | - | महेंद्र कपूर |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.