A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तुम्ही रे दोन दोनच माणसं

तुम्ही रे दोन
दोनच माणसं
माझी उभ्या अख्ख्या गावात
एक धाकुला
मनाचा किती किती मऊसा
जाईजुईहुन सुद्धा
तर दुसरा मोठा मोठा
जणू काय खडक थोरला
त्यात सुद्धा मधाचा झरा गोडगोड
माया दोघांची नव्हे अशी तशी
सोनंच बावनकशी

एक लहान्या
मंजूळपणे म्हणतो ताई
तर दुसरा मोठा आहे ना
तो तर देतो नुसता शिव्याच गो
पण कितीतरी, कितीतरी माया त्याची
बापासारखा, आईसारखा
तुम्ही रक्ताची नसून सुद्धा
रक्ताहुनी सख्खी दोन

हा उभा गाव, अख्खा गाव
म्हणतो मला पापी अवदसा
भाऊ रे भाऊ तूच सांग
रानातला झरा, पापी असणार तरी कसा
गावाची नजर वाकडी वाकडी
त्यांना मी दिसणार तशी