तुम्ही जाऊ नका हो रामा
तुम्ही जाऊ नका हो रामा, जीव तुम्हांवर जडला
नका सोडू अधांतरी, सुना तुम्हाविण बंगला
साजण रुसला ग धरिला अबोला
तुझ्या सावलीशी हिचा पाय गुंतलेला
कुंतीच्या गावची दु:ख भरली कथा
दाट वेणीत काळ्या फुले माळता
तुम्ही काट्यामुट्यांच्या वाटेवरी हो कसे भेटला
तुम्ही पाणकळा, माझा भरला मळा
तुमच्या सावलीच्या अंगावरती झळा
लळा लावून जाता आता सांगू कुणाला हा मामला
नका सोडू अधांतरी, सुना तुम्हाविण बंगला
साजण रुसला ग धरिला अबोला
तुझ्या सावलीशी हिचा पाय गुंतलेला
कुंतीच्या गावची दु:ख भरली कथा
दाट वेणीत काळ्या फुले माळता
तुम्ही काट्यामुट्यांच्या वाटेवरी हो कसे भेटला
तुम्ही पाणकळा, माझा भरला मळा
तुमच्या सावलीच्या अंगावरती झळा
लळा लावून जाता आता सांगू कुणाला हा मामला
गीत | - | ना. धों. महानोर |
संगीत | - | आनंद मोडक |
स्वर | - | आशा भोसले, देवकी पंडित |
चित्रपट | - | एक होता विदूषक |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लावणी |
पाणकळा | - | पाऊस. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.