तुला पाहते रे
हाक देता तुला साद जाते मला
वेगळे प्रेम हे वेगळा सोहळा
कोण जाणे जीवनाचा खेळ आहे हा कसा
चेहराही तूच माझा, तूच माझा आरसा
तुला पाहते रे !
पाहिले मी तुला पाहताना मला
पाहता पाहता हात हाती दिला
वेचताना वाटतो हा पारिजाताचा सडा
आणि माझा स्पर्श ज्याचे नाव सांगे केवडा
तुला पाहते रे !
तू जुनी पालवी, तू ऋतूही नवा
ऊनही तूच तू, तूच तू गारवा
ओळखीचा डोह आहे, ओळखीचा भोवरा
काय सांगू आठवांना हा खरा की तो खरा?
तुला पाहते रे !
सूर आहेस की मौन आहेस तू
का कळेना मला कोण आहेस तू
बोलक्या डोळ्यांत दिसते ओठ मिटली शांतता
भूतकाळाच्या किनारी थांबुनी ही आर्तता
तुला पाहते रे !
वेगळे प्रेम हे वेगळा सोहळा
कोण जाणे जीवनाचा खेळ आहे हा कसा
चेहराही तूच माझा, तूच माझा आरसा
तुला पाहते रे !
पाहिले मी तुला पाहताना मला
पाहता पाहता हात हाती दिला
वेचताना वाटतो हा पारिजाताचा सडा
आणि माझा स्पर्श ज्याचे नाव सांगे केवडा
तुला पाहते रे !
तू जुनी पालवी, तू ऋतूही नवा
ऊनही तूच तू, तूच तू गारवा
ओळखीचा डोह आहे, ओळखीचा भोवरा
काय सांगू आठवांना हा खरा की तो खरा?
तुला पाहते रे !
सूर आहेस की मौन आहेस तू
का कळेना मला कोण आहेस तू
बोलक्या डोळ्यांत दिसते ओठ मिटली शांतता
भूतकाळाच्या किनारी थांबुनी ही आर्तता
तुला पाहते रे !
गीत | - | वैभव जोशी |
संगीत | - | अशोक पत्की |
स्वर | - | आर्या आंबेकर |
गीत प्रकार | - | मालिका गीत |
टीप - • शीर्षक गीत, मालिका- तुला पाहते रे, वाहिनी- झी मराठी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.