A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तुझ्याचसाठीं कितीदां

तुझ्याचसाठीं
कितीदां
तुझ्याचसाठीं रे !

मीं दुहेरी
बांधल्या
खूणगाठी रे !

मी दुपारीं
सोसलें
ऊन माथीं रे !

लाविल्या मीं
मंदिरीं
सांजवाती रे !

कैक आल्या,
संपल्या
चांदराती रे !

मीं जगाच्या
सोडल्या
रीतभाती रे !