तुझ्या गळां माझ्या गळां
"तुझ्या गळां, माझ्या गळां
गुंफूं मोत्यांच्या माळा-"
"ताई, आणखि कोणाला?"
"चल रे दादा चहाटळा !"
"तुज कंठी, मज अंगठी !"
"आणखि गोफ कोणाला?"
"वेड लागलें दादाला !"
"मला कुणाचें? ताईला !"
"तुज पगडी, मज चिरडी !"
"आणखि शेला कोणाला?"
"दादा, सांगूं बाबांला?"
"सांग तिकडच्या स्वारीला !"
"खुसूं खुसूं, गालिं हसूं-"
"वरवर अपुले रुसूं रुसूं"
"चल निघ, येथे नको बसूं"
"घर तर माझें तसू तसू."
"कशी कशी, आज अशी"
"गम्मत ताईची खाशी !"
"अता कट्टी फू दादाशीं"
"तर मग गट्टी कोणाशीं?"
गुंफूं मोत्यांच्या माळा-"
"ताई, आणखि कोणाला?"
"चल रे दादा चहाटळा !"
"तुज कंठी, मज अंगठी !"
"आणखि गोफ कोणाला?"
"वेड लागलें दादाला !"
"मला कुणाचें? ताईला !"
"तुज पगडी, मज चिरडी !"
"आणखि शेला कोणाला?"
"दादा, सांगूं बाबांला?"
"सांग तिकडच्या स्वारीला !"
"खुसूं खुसूं, गालिं हसूं-"
"वरवर अपुले रुसूं रुसूं"
"चल निघ, येथे नको बसूं"
"घर तर माझें तसू तसू."
"कशी कशी, आज अशी"
"गम्मत ताईची खाशी !"
"अता कट्टी फू दादाशीं"
"तर मग गट्टी कोणाशीं?"
गीत | - | भा. रा. तांबे |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | आशा भोसले, सुधीर फडके |
राग | - | भीमपलास |
गीत प्रकार | - | बालगीत |
टीप - • काव्य रचना- २० जून १९०७, इंदूर. |
चहाटळ | - | चावट. |
चिरडी | - | साडी. |
तसू | - | दोन बोटांचे माप. |
नोंद
बालांसाठी जे गीत ते बालगीत. या प्रकारच्या गीतांत मुलांना रुचतील असे विषय असावे लागतात. खेळ, दांडगाई, भातुकली, चिऊकाऊ, बागुलबुवा असे प्रसंग यात पाहिजेत. तात्पर्य, मुलांचे जेणेकरून रंजन होईल अशी ही गीते असली पाहिजेत. हे गीत या प्रकारचे आहे. मुलांस अद्भुत, हास्य, भयानक इत्यादि रस फार आवडतात.
- 'तांबे यांची समग्र कविता' मध्ये नमूद केलेली टिप्पणी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.