तुझी सूरत मनात राया
तुझी सूरत मनात राया भरली रे
डाव्या डोळ्यात छबी तुझी कोरली
काल सांजच्यापारी उभी होते दारी
रान वार्यावरी हो रान वार्यावरी
तुझ्या ओठांतली शीळ भिरभिरली
रूप तुझं पाहून मन गेलं मोहून
अन् राहून राहून बाई राहून राहून
दिठी तुझ्याच मागं मागं फिरली
नवतीची कळा वय माझं सोळा
स्वभाव साधा भोळा ग बाई साधा भोळा
दोन्ही गालांवरी लाज थरथरली
डाव्या डोळ्यात छबी तुझी कोरली
काल सांजच्यापारी उभी होते दारी
रान वार्यावरी हो रान वार्यावरी
तुझ्या ओठांतली शीळ भिरभिरली
रूप तुझं पाहून मन गेलं मोहून
अन् राहून राहून बाई राहून राहून
दिठी तुझ्याच मागं मागं फिरली
नवतीची कळा वय माझं सोळा
स्वभाव साधा भोळा ग बाई साधा भोळा
दोन्ही गालांवरी लाज थरथरली
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | शोभा गुर्टू |
गीत प्रकार | - | लावणी, नयनांच्या कोंदणी, मना तुझे मनोगत |
नवती | - | तारुण्याचा भर. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.