A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तुझी झाले रे

गगनामधुनी देखियले तुज- सांगाया गुज आले रे
तुझी झाले रे तुझी झाले !

हिमराजींच्या अंगावरती बाळपणाची फुलली नाती
कुंवारपण येताच मनाला ओढ अनामिक कळली होती
क्षितिजामागून येता चाहूल नकळत पाऊल पडले रे !

उंच पहाडी, राने-डोंगर, खोल दर्‍यांचा अवघड परिसर
कधी काळोखी दाटुन येता फसव्या वाटा झाल्या धूसर
हृदयामधल्या दीपासोबत वाट विचारत आले रे !