तुझेच रूप सखे पाहूनिया
तुझेच रूप सखे पाहुनिया फसलो ग
असेल चूक ही, मी यौवनात चुकलो ग !
सारी सारी रात मनी येउनी तू छळसी का?
ही तुझी हार सखे
मम हृदयात तूच फिरुनी फिरुनी बघसी का?
ही तुझी हार सखे
गुलाबी रंग तुझा पाहुनिया भुललो ग
असेल चूक ही, मी यौवनात चुकलो ग !
अनुपम नेत्र तुझे रोखुनिया हससी का?
ही तुझी हार सखे
झुलवुनी रोज मला दूरदूर पळसी का?
ही तुझी हार सखे
उरात हट्ट तुझे घेउनिया बसलो ग
असेल चूक ही, मी यौवनात चुकलो ग !
असेल चूक ही, मी यौवनात चुकलो ग !
सारी सारी रात मनी येउनी तू छळसी का?
ही तुझी हार सखे
मम हृदयात तूच फिरुनी फिरुनी बघसी का?
ही तुझी हार सखे
गुलाबी रंग तुझा पाहुनिया भुललो ग
असेल चूक ही, मी यौवनात चुकलो ग !
अनुपम नेत्र तुझे रोखुनिया हससी का?
ही तुझी हार सखे
झुलवुनी रोज मला दूरदूर पळसी का?
ही तुझी हार सखे
उरात हट्ट तुझे घेउनिया बसलो ग
असेल चूक ही, मी यौवनात चुकलो ग !
गीत | - | उमाकांत काणेकर |
संगीत | - | श्रीकांत ठाकरे |
स्वर | - | सुरेश वाडकर |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.