तुझे रूप चित्ती राहो
तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दास सुखे करो काम
देहधारी जो जो त्यासी विहित नित्यकर्म
सदाचार नीतीहुनी आगळा ना धर्म
तुला आठवावे गावे हाच एक नेम
तुझे नाम पांडुरंगा सर्व ताप नाशी
वाट प्रवासासी देती स्वये पापराशी
दिसो लागली तू डोळा, अरूपी अनाम
तुझ्या पदी वाहिला मी देहभाव सारा
उडे अंतराळी आत्मा सोडुनी पसारा
नाम तुझे घेतो गोरा म्हणून आठयावं
देह प्रपंचाचा दास सुखे करो काम
देहधारी जो जो त्यासी विहित नित्यकर्म
सदाचार नीतीहुनी आगळा ना धर्म
तुला आठवावे गावे हाच एक नेम
तुझे नाम पांडुरंगा सर्व ताप नाशी
वाट प्रवासासी देती स्वये पापराशी
दिसो लागली तू डोळा, अरूपी अनाम
तुझ्या पदी वाहिला मी देहभाव सारा
उडे अंतराळी आत्मा सोडुनी पसारा
नाम तुझे घेतो गोरा म्हणून आठयावं
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | सुधीर फडके |
चित्रपट | - | संत गोरा कुंभार |
राग | - | जौनपुरी |
गीत प्रकार | - | चित्रगीत, विठ्ठल विठ्ठल |
आगळा | - | अग्रेसर / श्रेष्ठ / जास्त / अधिक / वैशिष्ट्यपूर्ण. |
विहित | - | शास्त्रोक्त, योग्य. |
स्वये | - | स्वत: |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.