तुझा तसाच गोडवा
तुझा तसाच गोडवा, असेलही.. नसेलही
तसा उन्हांत गारवा, असेलही.. नसेलही..
अजून रोज हिंडते, नभांत एक पाखरू
उदास तोच पारवा, असेलही.. नसेलही..
निवांत एकटाच मी, निवांत ही तुझी नशा
तुझ्या स्वरांत 'मारवा', असेलही.. नसेलही..
किती अनोळखी इथे मला सुगंध भेटती
हवी तशीच ही हवा, असेलही.. नसेलही..
तसा उन्हांत गारवा, असेलही.. नसेलही..
अजून रोज हिंडते, नभांत एक पाखरू
उदास तोच पारवा, असेलही.. नसेलही..
निवांत एकटाच मी, निवांत ही तुझी नशा
तुझ्या स्वरांत 'मारवा', असेलही.. नसेलही..
किती अनोळखी इथे मला सुगंध भेटती
हवी तशीच ही हवा, असेलही.. नसेलही..
गीत | - | म. भा. चव्हाण |
संगीत | - | भीमराव पांचाळे |
स्वर | - | भीमराव पांचाळे |
गीत प्रकार | - | कविता |
पारवा | - | कबुतराची एक जात किंवा त्याच्या रंगाचा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.