तुझं नि माझं जमेना
तुझं नि माझं जमेना
परि माझ्यावांचुन करमेना !
आवड तुजला भांडायाची
तूंहि शोधिसी संधी त्याची
कैसें होईल जीवन सुखकर
जोंवरी तव ही रीती
हेंच सुखाचें साधन सखये !
तरुणांच्या संसारीं
मानशील का तूं मज राणी?
होईन राजा मीही त्या क्षणीं
तूं राजा, मी राणी जोंवरी
कोण कुणाचा धनी
केव्हां मी तव स्वामी
केव्हां तूं माझी स्वामिनी
परि माझ्यावांचुन करमेना !
आवड तुजला भांडायाची
तूंहि शोधिसी संधी त्याची
कैसें होईल जीवन सुखकर
जोंवरी तव ही रीती
हेंच सुखाचें साधन सखये !
तरुणांच्या संसारीं
मानशील का तूं मज राणी?
होईन राजा मीही त्या क्षणीं
तूं राजा, मी राणी जोंवरी
कोण कुणाचा धनी
केव्हां मी तव स्वामी
केव्हां तूं माझी स्वामिनी
गीत | - | मो. ग. रांगणेकर |
संगीत | - | श्रीधर पार्सेकर |
स्वर | - | ज्योत्स्ना भोळे, मास्टर अविनाश |
नाटक | - | तुझं माझं जमेना |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत, युगुलगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.