तुझा अचानक झाला परिचय
तुझा अचानक झाला परिचय, काय नवल घडले
बघता बघता मोहरले मन तुजवरती जडले
कळली रे मजला ती डोळ्यांची भाषा
पापण्यांत लपली उतावीळ अभिलाषा
लाजेत रंगली चोरभेटीची आशा
अन् बोल मनातिल ओठांवर अडले
पावसातली सोबत सहजच सात पावलांची
भेट पळाची, गाठ बांधते जन्माजन्माची
अक्षताच की अंगावरती बरसातीच्या सरी
साधायाते मंगल अपुले भिजल्या वाटेवरी
पाखरू प्रीतीचे हृदयी फडफडले
बघता बघता मोहरले मन तुजवरती जडले
कळली रे मजला ती डोळ्यांची भाषा
पापण्यांत लपली उतावीळ अभिलाषा
लाजेत रंगली चोरभेटीची आशा
अन् बोल मनातिल ओठांवर अडले
पावसातली सोबत सहजच सात पावलांची
भेट पळाची, गाठ बांधते जन्माजन्माची
अक्षताच की अंगावरती बरसातीच्या सरी
साधायाते मंगल अपुले भिजल्या वाटेवरी
पाखरू प्रीतीचे हृदयी फडफडले
गीत | - | राजा बढे |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | प्रमोदिनी देसाई |
गीत प्रकार | - | भावगीत |
अभिलाष(षा) | - | इच्छा, लालसा / तृष्णा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.