तूच मायबाप बंधू
तूच माय-बाप-बंधू तूच प्राणसखा
दीन दुःखितांचा एक तूच पाठीराखा
धरित्रीची शय्या देशी, आभाळाची छाया
जाणिवेच्या पलीकडे उभी तुझी माया
परि तुझ्या ओळखीला माणूस पारखा
तुझ्या हाती असे एक पुरातन काठी
आवाज ना येई तिचा, दिसे ना कुणा ती
कुणा देतसे आधार, कुणाला तडाखा
सज्जनांचा कैवारी तू दुर्जनांचा वैरी
अनाथांच्या नाथा तुझी रूपे नानापरी
तुझ्याविना उभा जन्म होईल पोरका
दीन दुःखितांचा एक तूच पाठीराखा
धरित्रीची शय्या देशी, आभाळाची छाया
जाणिवेच्या पलीकडे उभी तुझी माया
परि तुझ्या ओळखीला माणूस पारखा
तुझ्या हाती असे एक पुरातन काठी
आवाज ना येई तिचा, दिसे ना कुणा ती
कुणा देतसे आधार, कुणाला तडाखा
सज्जनांचा कैवारी तू दुर्जनांचा वैरी
अनाथांच्या नाथा तुझी रूपे नानापरी
तुझ्याविना उभा जन्म होईल पोरका
गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | भास्कर चंदावरकर |
स्वर | - | श्रीकांत पारगांवकर |
चित्रपट | - | एक डाव भुताचा |
गीत प्रकार | - | भक्तीगीत, चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.