A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तू येता सखि माझ्या सदनी

तू येता सखि माझ्या सदनी
जीवन सुफलित झाले !

तू संजीवक सुखदा मूर्ती
प्रणयार्ताची आशापूर्ती
स्‍नेहमयी तू प्रीती ! प्रीती !
युगायुगांचे तृषित हृदय हे
तुजला बघुन निवाले !