तू विसरुनी जा रे
तू विसरुनी जा रे, विसरुनी जा
तुझ्या जीवनी चुकुनी आले, चुकले होते वाट
यौवनाची आली चाहूल, तिथे थबकले प्रीतीपाऊल
परिचय झाला आणिक अवचित केली जिवाला साथ
दिनराती ज्या स्वप्नी रमले, प्रीतस्वप्न ते पुरे भंगले
दृष्ट लागली सांग कुणाची, फसला सारा घाट
इच्छा एकच उरी धरी मी, तुला वरावे पुढल्या जन्मी
या जन्मी तर असाच साहिन दैवाचा उत्पात
तुझ्या जीवनी चुकुनी आले, चुकले होते वाट
यौवनाची आली चाहूल, तिथे थबकले प्रीतीपाऊल
परिचय झाला आणिक अवचित केली जिवाला साथ
दिनराती ज्या स्वप्नी रमले, प्रीतस्वप्न ते पुरे भंगले
दृष्ट लागली सांग कुणाची, फसला सारा घाट
इच्छा एकच उरी धरी मी, तुला वरावे पुढल्या जन्मी
या जन्मी तर असाच साहिन दैवाचा उत्पात
गीत | - | गंगाधर महाम्बरे |
संगीत | - | यशवंत देव |
स्वराविष्कार | - | ∙ आशा भोसले ∙ साधना सरगम ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
गीत प्रकार | - | भावगीत |
टीप - • स्वर- आशा भोसले, संगीत- यशवंत देव • स्वर- साधना सरगम, संगीत- मंदार आपटे. |
उत्पात | - | अनर्थ. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.