A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तूं माझी माउली (१)

तूं माझी माउली तूं माझी साउली ।
पाहतों वाटुली पांडुरंगे ॥१॥

तूं मज येकुला वडील धाकुला ।
तूं मज आपुला सोयरा जीव ॥२॥

तुका ह्मणे जीव तुजपाशीं असे ।
तुजविण ओस सर्व दिशा ॥३॥
भावार्थ-

  • हे पांडुरंगा तूच माझी आई आहेस. सुखाची सावली आहेस. मी तुझी एकसारखी वाट पहात असतो.
  • वडील आणि धाकटा असा तूच एकटा आहेस. माझ्या जिवाचा नातेवाईकही तूच आहेस.
  • तुकाराम महाराज म्हणतात हे देवा, माझा जीव तुझ्याजवळ आहे. मला सगळ्या दिशा तुझ्याशिवाय शून्य वाटतात, ओसाड वाटतात.

गो. वि. नामजोशी
संत तुकारामाची सार्थ अभंगवाणी
सौजन्य- सुलभ प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर भावार्थ

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.