तू गेल्यावर असे हरवले
तू गेल्यावर असे हरवले सूर, हरवले गाणे
वेलीवरचे फूल ठिबकले, हळवे दर्द दिवाणे
शब्दांचा संभार आटला
गीतातुन अंधार दाटला
पाण्यावर थरथरले अवचित मार्दव अश्रू-तराणे
पंखापरी फडफडल्या तारा
पानांतुन तडफडला वारा
इंद्रधनूचे रंग संपले, उरले गंध विराणे
हृदयाचे हुंकार कोपले
नयनांचे अभिसार लोपले
प्रीतीलतेच्या हरित व्यथेचे गहिवरले नजराणे
वेलीवरचे फूल ठिबकले, हळवे दर्द दिवाणे
शब्दांचा संभार आटला
गीतातुन अंधार दाटला
पाण्यावर थरथरले अवचित मार्दव अश्रू-तराणे
पंखापरी फडफडल्या तारा
पानांतुन तडफडला वारा
इंद्रधनूचे रंग संपले, उरले गंध विराणे
हृदयाचे हुंकार कोपले
नयनांचे अभिसार लोपले
प्रीतीलतेच्या हरित व्यथेचे गहिवरले नजराणे
गीत | - | शांताराम नांदगांवकर |
संगीत | - | अरुण पौडवाल |
स्वर | - | सुरेश वाडकर |
गीत प्रकार | - | भावगीत |
अभिसार | - | ठरविलेल्या जागी (प्रियकराचे) भेटणे किंवा अशी जागा. |
लता (लतिका) | - | वेली. |
संभार | - | संग्रह / समुदाय / सामग्री. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.