तिन्हीसांज होते तुझी याद
तिन्हीसांज होते, तुझी याद येते
नयनी बाहुल्यांची जोडी आसवात न्हाते
ऊन-सावल्यांची होते उराउरी भेट
भिरी पाखरांची येती कोटरात थेट
घराकडे घुंगुरांची परततात गीते
सुगंधास ओढुन घेती पाकळ्या कुशीत
जुळे पिंगळ्याचे बोले काहीसे खुशीत
डोंगरात जातो वारा डोलवीत शेते
अशा वेळी माझ्या राजा हवी तुझी साथ
मान तुझ्या छातीवरती, तुझ्या करी हात
मुक्यानेच माझी प्रीती तुला बोलविते
नयनी बाहुल्यांची जोडी आसवात न्हाते
ऊन-सावल्यांची होते उराउरी भेट
भिरी पाखरांची येती कोटरात थेट
घराकडे घुंगुरांची परततात गीते
सुगंधास ओढुन घेती पाकळ्या कुशीत
जुळे पिंगळ्याचे बोले काहीसे खुशीत
डोंगरात जातो वारा डोलवीत शेते
अशा वेळी माझ्या राजा हवी तुझी साथ
मान तुझ्या छातीवरती, तुझ्या करी हात
मुक्यानेच माझी प्रीती तुला बोलविते
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | ललिता फडके |
चित्रपट | - | चिमण्यांची शाळा |
गीत प्रकार | - | चित्रगीत, नयनांच्या कोंदणी |
कोटर | - | झाडातली ढोली. |
जुळे | - | जोडी, युगुल. |
तिनिसांज | - | सांजवेळ, तिनिसांज, तिनिसांजा, तिनीसांज, तिनीसांजा, तिन्हिसांजा, कातरवेळ हे सर्व शब्द 'संध्याकाळ' या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. सांजवणे, सांजावणे, सांजळणे म्हणजे संध्याकाळ होणे. |
पिंगूळ | - | एक पक्षी. |
भिरे | - | समुदाय. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.