A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
थाट समरिचा दावी नट

थाट समरिचा दावी नट साचा;
परि येतां मग काळ करणिचा, लागतो नाट ॥

स्वयंवरा मम नटवा आला; सोंग सजविलें,
धनुला धरिलें, मत्स्य दिसेना, बाण चढविना;
जय पावेना हा थयथयाट ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - भास्करबुवा बखले
स्वर-
नाटक - द्रौपदी
राग - हमीर
ताल-त्रिवट
चाल-धीट लंगरवा
गीत प्रकार - नाट्यसंगीत
  
टीप -
• या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल.
साच - खरे, सत्य / पावलाचा किंवा हालचालीचा आवाज.
'मयसभें'तील दुर्योधनाच्या मत्सरापासून प्रारंभ करून वनवासाला पांडव व द्रौपदी जाईपर्यंतचा महाभारताचा कथाभाग ह्या नाटकांत घेतला आहे.

नाटकांतील पदांच्या चाली प्रिन्सिपाल भास्करबुवा बखले यांजकडून मुख्यतः घेतल्या असून 'गंधर्व नाटक मंडळी'तील रा. बालगंधर्व आदि करून गायनपटु नटांनीहि ह्या काम चांगली मदत केली आहे. ह्याबद्दल 'गंधर्व नाटक मंडळी' व प्रिन्सिपाल भास्करबुवा बखले यांचा मी फार आभारी आहे.

फार परिश्रम घेऊन नाटक बसविल्याबद्दल 'गंधर्व नाटक मंडळी'चे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.
(संपादित)

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
दि. १ डिसेंबर १९२०
'संगीत द्रौपदी' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- यशवंत कृष्ण खाडिलकर (प्रकाशक)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.