थंडगार ही हवा त्यात धुंद
थंडगार ही हवा त्यात धुंद गारवा
अशा सुरेख संगमी जवळ तू मला हवा !
निळ्या नभात चालली दूर दूर पाखरे
दूर ना जरी तुझ्या जीव अंतरी झुरे
अंतरात बोलतो अबोल प्रीत पारवा
संथ या जलाशयी गात गान कमलिनी
हळूच लाजता मनी फुलत राग-रागिणी
गंध त्यात चंदनी, स्वरांत येई गोडवा
फूल प्रीतीचे कुणा अनामिकास वाहते
मुग्धता परि मना नवेच काही सांगते
अशा सुरम्य संभ्रमी भास आगळा नवा
अशा सुरेख संगमी जवळ तू मला हवा !
निळ्या नभात चालली दूर दूर पाखरे
दूर ना जरी तुझ्या जीव अंतरी झुरे
अंतरात बोलतो अबोल प्रीत पारवा
संथ या जलाशयी गात गान कमलिनी
हळूच लाजता मनी फुलत राग-रागिणी
गंध त्यात चंदनी, स्वरांत येई गोडवा
फूल प्रीतीचे कुणा अनामिकास वाहते
मुग्धता परि मना नवेच काही सांगते
अशा सुरम्य संभ्रमी भास आगळा नवा
गीत | - | मधुकर जोशी |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | एक धागा सुखाचा |
राग | - | पहाडी |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
आगळा | - | अग्रेसर / श्रेष्ठ / जास्त / अधिक / वैशिष्ट्यपूर्ण. |
कमळिणी | - | कमलिनी. कमळण. कमळाची वेल. |
पारवा | - | कबुतराची एक जात किंवा त्याच्या रंगाचा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.