थांब रे घना
थांब रे घना,
जा निरोप घेउनी, सांग मोहना
कुंज कुंज हा उदास
जागेपणी होत भास
तूच एक जाणिसी माझिया मना
एकटीच झुरत उभी
तारका न एक नभी
एकटीच सोसते सर्व यातना
सांग जाउनी तयास
वैरी माझेच श्वास
फूलही मला इथे होय वेदना
जा निरोप घेउनी, सांग मोहना
कुंज कुंज हा उदास
जागेपणी होत भास
तूच एक जाणिसी माझिया मना
एकटीच झुरत उभी
तारका न एक नभी
एकटीच सोसते सर्व यातना
सांग जाउनी तयास
वैरी माझेच श्वास
फूलही मला इथे होय वेदना
गीत | - | मंगेश पाडगांवकर |
संगीत | - | विश्वनाथ मोरे |
स्वराविष्कार | - | ∙ उषा मंगेशकर ∙ साधना सरगम ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, भावगीत |
टीप - • स्वर- उषा मंगेशकर, संगीत- विश्वनाथ मोरे. • स्वर- साधना सरगम, संगीत- मंदार आपटे. |
कुंज | - | वेलींचा मांडव. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.