ते कसे ग ते कसे
ते कसे ग ते कसे?
देव्हार्यातिल देव जसे !
कोंदणातले ते रत्न जसे, तसेच त्यांचे तेज असे
पळभर माझ्यावाचुन त्यांना मुळीच बाई चैन नसे !
ते असे ग ते असे, देव्हार्यातिल देव जसे !
आणि सासरे तुझे कसे? मामंजी ग, बाई कसे?
रागिट चर्या, मनांत माया, मुळी वावगे खपत नसे
मामंजी ते बाई असे, फणसामधले गरे जसे !
आणि तुझी ती सासू कशी?
निर्मळ गंगामाय जशी
राग तयांचा आग परि त्या मायेलाही अंत नसे
सासुबाईंना 'आई' म्हणावे असेच मला वाटतसे !
नणंद बाई तुझी कशी?
लवंगी मिरची तिखट जशी
ठेंगणी ठुसकी, मुळांत रुसकी, नटण्यावाचून काम नसे
चुरुचुरू बोलतें, चहाड्या करतें, उणे सारखे काढितसे !
दीर तुझे ते बाई कसे, तुझे भाओजी सांग कसे?
आपण हसती, जगा हसविती, राग तयांचा येत नसे
भावावरती प्रेम असे की रामप्रभुंचे भरत जसे !

गीत | - | विहंग |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | मालती पांडे, प्रमोदिनी देसाई |
गीत प्रकार | - | भावगीत |
कोंदण | - | दागिन्यातील हिरे वगैरे भोवतीची घडण. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.