तव भास अंतरा झाला
तव भास अंतरा झाला, मन रमतां, मोहना
हासतीं फुले भवताली
मधुर ये फळावर लाली
स्मितसाम्य तुझ्या अधरींचें मम खिळवी लोचना !
वाहत ये झुळझुळ वारा
दरवळला परिमळ सारा
तव हृदयपुष्पगंधाची अनुभवितें कल्पना !
हासतीं फुले भवताली
मधुर ये फळावर लाली
स्मितसाम्य तुझ्या अधरींचें मम खिळवी लोचना !
वाहत ये झुळझुळ वारा
दरवळला परिमळ सारा
तव हृदयपुष्पगंधाची अनुभवितें कल्पना !
गीत | - | कवी गिरीश |
संगीत | - | पं. जितेंद्र अभिषेकी |
स्वर | - | आशालता वाबगावकर |
नाटक | - | मत्स्यगंधा |
राग | - | मिश्र मांड |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत, हे श्यामसुंदर |
टीप - • काव्य रचना- ३० सप्टेंबर १९२९, पुणे. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.