टप् टप् पडती अंगावरती
टप् टप् पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
भिर् भिर् भिर् भिर् त्या तालावर गाणे अमुचे जुळे !
कुरणावरती, झाडांखाली
ऊन-सावली विणते जाळी
येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डुले !
दूर दूर हे सूर वाहती
उन्हात पिवळ्या पहा नाहती
हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले !
गाणे अमुचे झुळझुळ वारा
गाणे अमुचे लुकलुक तारा
पाऊस वारा मोरपिसारा, या गाण्यातुन फुले !
फुलांसारखे सर्व फुला रे
सुरांत मिसळुनि सूर चला रे
गाणे गाती तेच शहाणे, बाकी सारे खुळे !
भिर् भिर् भिर् भिर् त्या तालावर गाणे अमुचे जुळे !
कुरणावरती, झाडांखाली
ऊन-सावली विणते जाळी
येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डुले !
दूर दूर हे सूर वाहती
उन्हात पिवळ्या पहा नाहती
हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले !
गाणे अमुचे झुळझुळ वारा
गाणे अमुचे लुकलुक तारा
पाऊस वारा मोरपिसारा, या गाण्यातुन फुले !
फुलांसारखे सर्व फुला रे
सुरांत मिसळुनि सूर चला रे
गाणे गाती तेच शहाणे, बाकी सारे खुळे !
गीत | - | मंगेश पाडगांवकर |
संगीत | - | वसंत देसाई |
स्वर | - | वाणी जयराम, आकाशवाणी गायकवृंद |
गीत प्रकार | - | बालगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.