टक्टक् नजर पडतोय् पदर
टक्टक् नजर पडतोय् पदर
नार तोर्यात नखर्यात चालते
डाव्या डोळ्याची शीळ अशी घालते
रंगानं सावळा, दिसायला देखणा
मनात भरला वळखीचा पावणा
हसतोय् गालात करतोय् खुणा
नजरेला नजर बाई ग, तुझीमाझी जुळते
पदराचा पतंग व्हटात धरला
धुंदीचा वारा अंगात शिरला
मनाचा भवरा गरगर फिरला
मदनाच्या मिठीत ही ग, कमळण डुलते
नार तोर्यात नखर्यात चालते
डाव्या डोळ्याची शीळ अशी घालते
रंगानं सावळा, दिसायला देखणा
मनात भरला वळखीचा पावणा
हसतोय् गालात करतोय् खुणा
नजरेला नजर बाई ग, तुझीमाझी जुळते
पदराचा पतंग व्हटात धरला
धुंदीचा वारा अंगात शिरला
मनाचा भवरा गरगर फिरला
मदनाच्या मिठीत ही ग, कमळण डुलते
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | दत्ता डावजेकर |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | सून लाडकी या घरची |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लावणी, नयनांच्या कोंदणी |
कमळिणी | - | कमलिनी. कमळण. कमळाची वेल. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.