A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ताईबाई अता होणार लगीन

ताईबाई ताईबाई ग
अता होणार लगीन तुमचं !

नखराबिखरा सारा विसरा
धम्मक लाडू चारील नवरा
नवरा म्हणजे बागुलबुवा
घेऊन जाईल त्याच्या गावा
तिथे सिनेमा नाटक कुठचं?

धुणी धुवा मग झाडून काढा
रांधा वाढा उष्टी काढा
निवडा तांदूळ, लाटा पोळ्या
शिवा टिपा मग सदरे-चोळ्या
करा शेवया, भरा ग लोणचं !

सासूबाई करतील वटवट
दीर-नणंदा देतील चापट
मामंजींना दमा खोकला
जा पिकदाणी त्यांची उचला
सुख सरलं हो बापाघरचं !