तार वाजे काळजाची
तार वाजे काळजाची
ओवी सुचे ज्ञानेशाची
आभाळाच्या कागदाची
सीमा झाली
इंद्रायणीचे वेल्हाळ
झुरुमुरू वाहे जळ
लाट होउनी निर्मळ
ओवी आली
समाधीस टेके माथा
चंद्र वेचिला मी हाता
जणू सूर्यासही नवी
प्रभा आली
काळजाच्या अक्षराला
स्पर्श अमृताचा झाला
जणू मुक्या प्रतिभेला
वाचा आली
ओवी सुचे ज्ञानेशाची
आभाळाच्या कागदाची
सीमा झाली
इंद्रायणीचे वेल्हाळ
झुरुमुरू वाहे जळ
लाट होउनी निर्मळ
ओवी आली
समाधीस टेके माथा
चंद्र वेचिला मी हाता
जणू सूर्यासही नवी
प्रभा आली
काळजाच्या अक्षराला
स्पर्श अमृताचा झाला
जणू मुक्या प्रतिभेला
वाचा आली
गीत | - | प्रवीण दवणे |
संगीत | - | नंदू होनप |
स्वर | - | पं. जितेंद्र अभिषेकी |
गीत प्रकार | - | भक्तीगीत |
प्रभा | - | तेज / प्रकाश. |
वेल्हाळ | - | परम प्रीतिपात्र. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.