स्वातंत्र्यसूर्य उगवला पोवाडा
स्वातंत्र्यसूर्य उगवला । अहो पूर्वेला । हिंद देशाला ।
सोन्याचा दिवस आज आला । पारतंत्र्याचा काळ गेला ।
शाहिरा जोम नवा चढला ॥
अहो ज्यांनी हाल सोसले । फास झेलले । आनंदे मेले ।
शांती आता मिळेल त्यांच्या आत्म्यास ।
आनंद होईल त्यांच्या चित्तास ।
पूर्णता आली त्यांच्या कार्यास ॥
जासूद होऊन स्वर्गामध्ये जाईल शाहीर ।
स्वतंत्र झाला भारत अपुला करण्या जाहीर ।
जाऊ या चला वेगात । इंद्राच्या दरबारात ।
गोळीने छिन्न जी छाती । जाऊ या तयांच्या भवती ।
फास ज्या गळ्यांमधी पडले । जाऊया तयांभवताले ॥
सत्तावनाच्या मृत वीरांना । नाना पेशवे, तात्या टोप्यांना ।
शूर बहाद्दर लक्ष्मीबाईंना । वासुदेव बळवंत फडक्यांना ।
दादाभाईंना, लोकमान्यांना । कर्वे-कान्हेरे-चाफेकरांना ।
खुदीराम अन् मदन धिंग्रांना । भगतसिंग-राजगुरू-दत्तांना ।
मल्लाप्पा । कुरबान-सारडांना । जतींद्रदास अन् बाबू गेनूना ।
क्रांतीकारक अन् क्रांतीवीरांना । बेचाळीसच्या बहाद्दरांना ।
सहस्र सत्याग्रही वीरांना । आझाद सेनेच्या लढवय्यांना ।
नौकादलातील नाखवा वीरांना । चला सांगूया याच बोलांना ।
'सलाम मालिक सलाम' । आपण नाही आज गुलाम ।
'सलाम मालिक सलाम' । शाहिराचा लवुनी प्रणाम ॥
पुण्याई फळाला आली । शृंखला तुटली ।
मायभू आपली । त्यागानं हो तुमच्या मुक्त झाली ।
सोन्याची संधी अम्हां आली । अंजली तुम्हां अर्पियली ॥
घामाविण नाही कुणा दाम । सर्वांना काम । योग्य आराम ।
याला स्वातंत्र्य पूर्ण म्हणतात । राखणं आहे तुमच्या हातात ।
विचार हा राहू द्यावा चित्तात ॥

गीत | - | वसंत बापट |
संगीत | - | |
स्वर | - | दत्ताराम म्हात्रे |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.