स्वर उमटावे शुभंकरोति
माझ्या हाते मी उजळाव्या घरात माझ्या मंगलज्योती
सुखद असावी अशीच संध्या, स्वर उमटावे शुभंकरोति
रात्री थकुनी निजण्यापूर्वी, ओठी याव्या अभंग-ओवी
भूपाळीते आळवीत मी जागे व्हावे पुन्हा प्रभाती
दिवस सरावा करिता सेवा, कंटाळा मज मुळी न यावा
नव्या घरी मी उजळ करावी मराठमोळी जुनी संस्कृती
मी रांधावे मी वाढावे, तुटू न देता हळू जोडावे
कुणावरून तरी ओवाळावे, जीवन व्हावे एक आरती

गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | दत्ता डावजेकर |
स्वर | - | आशा भोसले, अपर्णा मयेकर |
चित्रपट | - | प्रीत शिकवा मला |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
रांधणे | - | शिजवणे. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.