स्वप्ने मनातली का
स्वप्ने मनातली का वार्यावरी विरावी?
का प्रीतीच्याच दैवी ताटातुटी असावी?
फिरलो तसाच मागे वचनात गुंतुनीही
नाही तसा परि मी, ठावे तुला मलाही
माझी व्यथा अशी ही मज सांगता न यावी
का प्रीतीच्याच दैवी ताटातुटी असावी?
देऊन शब्द झाली प्रीतीच पाठमोरी
मी वंचिताच आता झाले जगासमोरी
कोणी अशी कुणाची का वंचना करावी?
का प्रीतीच्याच दैवी ताटातुटी असावी?
ते दु:ख वेदना ती येथून पाहतो मी
त्या मूक आसवांचा आकांत साहतो मी
फुलत्या वसंतकाळी का वीज कोसळावी?
का प्रीतीच्याच दैवी ताटातुटी असावी?
का प्रीतीच्याच दैवी ताटातुटी असावी?
फिरलो तसाच मागे वचनात गुंतुनीही
नाही तसा परि मी, ठावे तुला मलाही
माझी व्यथा अशी ही मज सांगता न यावी
का प्रीतीच्याच दैवी ताटातुटी असावी?
देऊन शब्द झाली प्रीतीच पाठमोरी
मी वंचिताच आता झाले जगासमोरी
कोणी अशी कुणाची का वंचना करावी?
का प्रीतीच्याच दैवी ताटातुटी असावी?
ते दु:ख वेदना ती येथून पाहतो मी
त्या मूक आसवांचा आकांत साहतो मी
फुलत्या वसंतकाळी का वीज कोसळावी?
का प्रीतीच्याच दैवी ताटातुटी असावी?
गीत | - | वसंत अवसरे |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | तलत महमूद, सुमन कल्याणपूर |
चित्रपट | - | पुत्र व्हावा ऐसा |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत, कल्पनेचा कुंचला, मना तुझे मनोगत |
वंचना | - | फसवणूक. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.