स्वप्नावरी स्वप्न पडे
स्वप्नावरी स्वप्न पडे, नीज ना मला
जागेपणी आठविते सारखी तुला !
प्रीतीचे घोष तुझ्या कानी ऐकिते
मूर्तीचे चित्र तुझ्या पदरी झाकिते
अंतरीचा भाव कधी तुज न उमगला !
भोळी मी पोर तुला दुरून पूजिते
सांगावे गुज असे रोज योजिते
काय करू साधेना कठीण ती कला !
हळुच तुझ्या छायेशी आज बोलते
शबरीच्या बोरांची शपथ तुला घालते
भिल्लिणीची भक्ती त्या राम समजला !
जागेपणी आठविते सारखी तुला !
प्रीतीचे घोष तुझ्या कानी ऐकिते
मूर्तीचे चित्र तुझ्या पदरी झाकिते
अंतरीचा भाव कधी तुज न उमगला !
भोळी मी पोर तुला दुरून पूजिते
सांगावे गुज असे रोज योजिते
काय करू साधेना कठीण ती कला !
हळुच तुझ्या छायेशी आज बोलते
शबरीच्या बोरांची शपथ तुला घालते
भिल्लिणीची भक्ती त्या राम समजला !
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | आकाशगंगा |
गीत प्रकार | - | चित्रगीत, कल्पनेचा कुंचला |
गुज | - | गुप्त गोष्ट, कानगोष्ट. |
शबरी | - | एक भिल्लीण. श्रीरामांची एकनिष्ठ भक्तीण. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.