स्वप्नात पाहिले जे ते राहू
स्वप्नात पाहिले जे ते राहू देत स्वप्नी
हे सत्य स्वप्नरंगी मी ऐकिले सुरांनी
मी पाहिले दिठीने लावण्य एक दैवी
त्या श्यामसुंदराला जी धुंद करिल देवी
परि आस या मनाची हा ध्यास एक देवा
लावण्य हेच दैवी माझे मला मिळावे
हे सत्य स्वप्नरंगी मी ऐकिले सुरांनी
मी पाहिले दिठीने लावण्य एक दैवी
त्या श्यामसुंदराला जी धुंद करिल देवी
परि आस या मनाची हा ध्यास एक देवा
लावण्य हेच दैवी माझे मला मिळावे
गीत | - | वसंत कानेटकर |
संगीत | - | पं. जितेंद्र अभिषेकी |
स्वर | - | रामदास कामत |
नाटक | - | मीरा.....मधुरा ! |
राग | - | गौड मल्हार |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत, कल्पनेचा कुंचला |
दिठी | - | दृष्टी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.