स्वप्न माझ्या जीविताचे
स्वप्न माझ्या जीविताचे तुजसवे साकारले
साजणा रे नेत्र आता लागले पैलतिरी
एक आशा ही परंतु जागते माझ्या ऊरी
पौर्णिमेचा चांद करू दे चांदण्याची वृष्टी रे
रोमरोमी गोड काटा मंद वारा फुलवू दे
बिलगुनी मी तुज बसावे मान वक्षी टेकुनी
अन् मिटावे मी सुखाने नेत्र माझे त्या क्षणी
साजणा रे नेत्र आता लागले पैलतिरी
एक आशा ही परंतु जागते माझ्या ऊरी
पौर्णिमेचा चांद करू दे चांदण्याची वृष्टी रे
रोमरोमी गोड काटा मंद वारा फुलवू दे
बिलगुनी मी तुज बसावे मान वक्षी टेकुनी
अन् मिटावे मी सुखाने नेत्र माझे त्या क्षणी
गीत | - | मा. ग. पातकर |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | |
गीत प्रकार | - | भावगीत, कल्पनेचा कुंचला |
टीप - • या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.