A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सुवर्णकेतकिपरि जो दिसतो

सुवर्णकेतकिपरि जो दिसतो वर्ण नव्हे तो दुसरीचा
सडपातळ नाजुक हा बांधा खचित त्याच मृदु देहाचा
पदतल बघतां भास होतसे नूतन संध्यारागाचा
कांचिमुळे ओळखतां येतो अमुक देश म्हणुनी कटिचा
निर्मुनी जीला कळसचि झाला धात्याचा चातुर्याचा
तेंचि असावें रत्‍न असा ग्रह झाला इस पाहुनि मतिचा