A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सूर निरागस हो

सूर निरागस हो..
गणपती, सूर निरागस हो..

शुभनयना करुणामय गौरीहर श्रीवरदविनायक ओंकार गणपती,
ॐकार गणपती, अधिपती, सुखपती, छंदपती, गंधपती
लीन निरंतर हो..
सूर निरागस हो..

मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया
गजवदना, तू सुखकर्ता
गजवदना, तू दुःखहर्ता
गजवदना मोरया मोरया

सूरसुमनांनी भरली ओंजळ
नित्य रिती व्हावी चरणांवर
तान्हे बालक सुमधुर हासे
भाव तसे वाहो सुरांतून

ॐकार गणपती, अधिपती, सुखपती, छंदपती, गंधपती
अधिपती, सुखपती, छंदपती. गंधपती. सूरपती
लीन निरंतर हो..
सूर निरागस हो..
सुमन - फूल.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  शंकर महादेवन, आनंदी जोशी