सूर आले शब्द ल्याले
सूर आले, शब्द ल्याले
माझ्या आर्जवी मनात मैत्र लाघवी जागले
आतुरले, वेडावले
माझ्या ओंजळीत कोणी फूल बकुळी शिंपले
वारा हाले, रान डोले
अनामिक चाहूल ये आनंदात मन न्हाले
गंधावले, धुंद झाले
माझ्या वेल्हाळ बोलाने घर रुणझुण झाले
घर सारे मुग्ध झाले
भिंत भिंत सुखावून तृप्त सौख्य नांदले
माझ्या आर्जवी मनात मैत्र लाघवी जागले
आतुरले, वेडावले
माझ्या ओंजळीत कोणी फूल बकुळी शिंपले
वारा हाले, रान डोले
अनामिक चाहूल ये आनंदात मन न्हाले
गंधावले, धुंद झाले
माझ्या वेल्हाळ बोलाने घर रुणझुण झाले
घर सारे मुग्ध झाले
भिंत भिंत सुखावून तृप्त सौख्य नांदले
गीत | - | नितीन आखवे |
संगीत | - | मधुराणी गोखले-प्रभुलकर |
स्वर | - | श्रेया घोषाल |
चित्रपट | - | सुंदर माझे घर |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.