सुखी ठेव देवा त्यांना
सुखी ठेव देवा त्यांना, सुखी ठेव देवा
आई करते माया रे
बाबा देती छाया रे
आजोबांनी उपदेशाचा मंत्र आम्हाला द्यावा, देवा
आम्ही होऊ श्रावण बाळ
मायपित्यांचा करू सांभाळ
कावड घेऊन चालत जाऊ पुण्याईच्या गावा, देवा
पुंडलिकाचे रूप धरू
मायपित्यांचे पाय चुरू
वीट फेकुनी तुला थांबवू परि न सोडू सेवा, देवा
आई करते माया रे
बाबा देती छाया रे
आजोबांनी उपदेशाचा मंत्र आम्हाला द्यावा, देवा
आम्ही होऊ श्रावण बाळ
मायपित्यांचा करू सांभाळ
कावड घेऊन चालत जाऊ पुण्याईच्या गावा, देवा
पुंडलिकाचे रूप धरू
मायपित्यांचे पाय चुरू
वीट फेकुनी तुला थांबवू परि न सोडू सेवा, देवा
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | बकुळ पंडित, राणी वर्मा |
चित्रपट | - | गणानं घुंगरू हरवलं |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
कावड | - | जड पदार्थ नेण्यासाठी आडव्या बांबूच्या दोन टोकांस दोन दोर्या बांधून त्याला ओझी अडकवण्याची केलेली व्यवस्था. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.